जेजुरी यात्रा, उत्सव

जेजुरीगड व कडेपठार खंडोबा मंदिरात होणारी भूपाळी, धूपआरती, शेजआरती हे दैनंदिन कार्यक्रम वर्षभर होणाऱ्या विविध यात्रा यांचे चित्रफिती द्वारे दर्शन,

जेजुरीगड, देंनदिंन कार्यक्रम कडेपठार, देंनदिंन कार्यक्रम

यात्रा

चैत्र पौर्णिमा सोमवती गणपुजा दसरा चंपाषष्ठी पौष पौर्णिमा माघ पौर्णीमा महाशिवरात्र

स्थानिक उत्सव

छबिना त्रिपुरी पौर्णिमा थोरली पाखाळणी दत्त जयंती जानाई उत्सव


*

खंडोबा मंदिर देंनदिंन कार्यक्रम

जेजुरीगड


भूपाळी – रोज पहाटे ५ वाजता मंदिर उघडते, विधी पूर्वक देव उठवून भूपाळी म्हणून पूजाविधी होऊन आरती केली जाते


धुपारती – दुपारी मध्यांनानंतर विधीपूर्वक पुजा करून आरती केली जाते.


शेजआरती – रात्री ९ वाजता विधीपूर्वक पुजाअर्चा करून देवाला शेज केली जाते व देव झोपवले जातात व मंदिर बंद होते
पाखाळणी – प्रत्येक महिन्याचे शुद्ध प्रतिपदेस सर्व मंदिराची सफाई करून, उत्सव मूर्ती, मार्तंड भेरव यांच्या मूर्तीस अभीषेक घालण्यात येतो.

*** मंदिर पहाटे उघडल्या पासून रात्री बंद होणे पर्यंत दर्शनासाठी खुले असते. रविवारी व यात्रा काळात गर्भगृहातील प्रवेश बंद असतो
*

कडेपठार


भूपाळी – रोज पहाटे ५ वाजता मंदिर उघडते, विधी पूर्वक देव उठवून भूपाळी म्हणून पूजाविधी होऊन आरती केली जाते


धुपारती – दुपारी मध्यांनानंतर विधीपूर्वक पुजा करून आरती केली जाते.
शेजआरती – रात्री ९ वाजता विधीपूर्वक पुजाअर्चा करून देवाला शेज केली जाते व देव झोपवले जातात व मंदिर बंद होते
पाखाळणी – प्रत्येक महिन्याचे शुद्ध प्रतिपदेस सर्व मंदिराची सफाई करून, उत्सव मूर्ती, मार्तंड भेरव यांच्या मूर्तीस अभीषेक घालण्यात येतो.
*** मंदिर पहाटे उघडल्या पासून रात्री बंद होणे पर्यंत दर्शनासाठी खुले असते.
*

यात्रा, उत्सव.

*
चैत्र पोर्णिमा.


हा मार्तंडाचा अवतारदिन , मणि मल्ल देत्यापासून पिडीत ऋषीनी शंकराची विनवणी केली व शंकरांनी चेत्र पोर्णिमा मध्यान्ह प्रहरी मार्तंडचा अवतार कडेपठारी धारण केला. या दिवशी जेजुरीत भक्तांची गर्दी उसळते. जेजुरीगड , कडेपठार, जेजुरी परिसर लोकांनी फुलुन जातो. कुलधर्म कुलाचारासाठी लोकांची गर्दी चिंचेची बाग व जेजुरी गावात सर्वत्र होते.
*

सोमवती अमावस्या


ज्या सोमवारी अमावस्या येते त्या दिवसास सोमवती असे म्हणतात. नदी स्नानासाठी हा पर्वकाळ मानला जातो. या दिवशी निर्धारित मुहूर्तावर कऱ्हानदी स्नानासाठी खंडोबाची पालखी जेजुरी गडावरून प्रस्थान करते. आणि भंडाराने सगळे वातावरण सुवर्णमय होते. बाणाई मंदिराकडून देव गड उतरून नंदीचौक, गोसावी मठ, छत्री मंदिर, जानाई मंदिर मार्गाने धालेवाडी पालखी रस्त्याने देव नदीवर पोहचतात हे अंतर सुमारे ७ किमी. आहे. नदीवर रंभाई विसाव्या जवळ उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नान घालण्यात येते. परतीच्या मार्गावर धालेवाडी गावातील बाबीर मंदिर, फुलाई माळनीचा विसावा या मार्गाने पालखी जेजुरी मध्ये येवून जानाई मंदिरा समोर विसावते. रात्री महाद्वार रस्त्याने पालखी मंदिरामध्ये पोहचते. रोजमरा वाटून सोमवती उत्सवाची सांगता होते. सोमवतीच्या या उत्सव सोहळ्या मध्ये मराठा, धनगर, लोहार, न्हावी, कोल्हाटी, गुरव, वडारी, रामोशी , बेलदार, बुरुड, परीट, माळी, तेली, मुस्लीम, मातंग, हरिजन, तांबट, वाणी, वाघे, गोंधळी, कुंभार, जोशी, खाटिक, ब्राह्मण, शिंपी, सुतार ,कोळी, वीर, घडशी, चांभार, गोसावी, कासार, सोनार, जेजुरी मधील सर्व जातीधर्मातील मानकरी व गावकरी यांचा सहभाग असतो, श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, समस्त गावकरी ट्रष्ट . जेजुरी. ही गावकऱ्यांची समिती या सोहळ्याचे नियोजन करते,
*

गणपूजा.


मणि मल्ल राक्षसावर विजय मिळवल्या नंतर खंडोबा आपल्या परिवारासह कडेपठारावर आले. तेव्हा देव गणांनी पुष्पवृष्टी केली व सर्व देवगण, ऋषींनी खंडोबाची पूजा केली तो दिवस आषाढ शुद्ध प्रतिपदा होता. तो दिवस कडेपठारी गणपूजा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रात्री देवास भंडाराची पूजा बांधली जाते. लिंग भंडारा आछादली जातात. मंदिरातून देवाचा छबिना [ पंचारती ] निघते व मंदिराला प्रदक्षिणा घालते. सोबत वाघ्या मुरळी, घडशी, खंडोबाची गीते वाजवून गाऊन छबिना रमवतात गर्भगृह भाविकांचे वाहिलेल्या भंडाराने भरून जाते. छबिन्याचा कार्यक्रम पहाटे पर्यंत चालतो. सकाळी देवाचे अंगावरील भंडार भाविकांना वाटण्यात येतो आणि संपूर्ण रात्र चाललेला गणपूजा उत्सव संपतो.

*

नवरात्र / दसरा.

अश्विन शुद्ध प्रतिपदे पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. प्रतिपदेस गड व कडेपठारी घटस्थापना करून उत्सवमूर्ती गडावर बारद्वारीत व कडेपठारी भंडारगृहात बसविल्या जातात. रोज रात्री जेजुरीगड रोषणाईने उजळून जातो. गडावरील बारद्वारीत दिवसभर देवा समोर वाघ्या मुरुळीचा हजेरीचा कार्यक्रम सुरु असतो. रात्री लोक कलाकार नृत्य गाणी सादर करून हजेरी लावतात. अनेक भाविक सकाळी नदी वरून पाण्याची कावड देवाला आणतात. नवरात्र संपे पर्यंत हा दिनक्रम असतो. नवरात्रात येणारे शनिवारी कडेपठारी लोक कलाकार नृत्य गाणी सादर करून हजेरी लावतात.
दसऱ्या दिवशी सायंकाळी जेजुरी गडावरील पालखी शिलंगणासाठी रमण्याकडे प्रस्थान करते हा सोहळा प्रेक्षणीय असतो. कडेपठार वरील पालखी रात्री रमण्याकडे प्रस्थान करते लोक कलाकारांच्या गीत संगीताच्या साथी मध्ये हवाईचे प्रकाशात डोंगर माथ्या वरून जाणारा हा पालखी सोहळा विलक्षण थराराचा. वाटेत शिलंगणाचे सोने लुटून हा सोहळा रमण्याचे माथ्यावर येउन पोहोचतो. जेजुरीगडा वरील पालखी रमण्यामध्ये डोंगराच्या पायथ्याला विसावते. आणि डोंगर माथ्या वरील कडेपठारची पालखी व पायथ्याची जेजुरीगडा वरील पालखी दोन्ही कडे दारूकामाचे अतिषबाजीस सुरवात होते. रमणा उजळून टाकणाऱ्या या अतिषबाजीत लोकवाद्याची साथ भक्ताचे डोळे आणि कान दोन्ही तृप्त करून टाकते.आणि या भारलेल्या वातावरणात दोन्ही पालख्या मधील आरशामधून दोन्ही खंडोबाची नजर भेंट होते. आणि दोन्ही पालख्या परतीच्या प्रवासाला निघतात. कडेपठारची पालखी बाणाई भेटी नंतर मंदिरात पोहचते हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे ४ किमी अंतराचा आहे. रोजमरा वाटून येथील उत्सव संपतो.दुसरी कडे गडा वरील पालखी शिलंगणाचे सोने लुटून गावात पोहचते अतिषबाजीत पायघड्याचे स्वागतात पालखी सकाळी गडावर पोहचते येथे अनेक लोककलाकार पालखी पुढे हजेरी लावतात. हा संपूर्ण पालखी मार्ग सुमारे ६ किमी अंतराचा आहे. रोजमरा वाटून पालखी सोहळ्याची सांगता होतानाच खंडास्पर्धा सुरु होतात अनेंक तरुण आपल्या शक्ती आणि युक्तीचे कलेचे प्रदर्शन करतात. विजेत्यांना पुरस्कारही दिले जातात. सुमारे १८ तास चालणारा हा लोककला, लोकशक्ती, लोकश्रद्धेचा हा सोहळा केवळ अवर्णनीयच या उत्सव सोहळ्या मध्ये मराठा, धनगर, लोहार, न्हावी, कोल्हाटी, गुरव, वडारी, रामोशी , बेलदार, बुरुड, परीट, माळी, तेली, मुस्लीम, मातंग, हरिजन, तांबट, वाणी, वाघे, गोंधळी, कुंभार, जोशी, खाटिक, ब्राह्मण, शिंपी, सुतार ,कोळी, वीर, घडशी, चांभार, गोसावी, कासार, सोनार, जेजुरी मधील सर्व जातीधर्मातील मानकरी व गावकरी यांचा सहभाग असतो, श्री क्षेत्र जेजुरी खंडोबा पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, समस्त गावकरी ट्रष्ट . जेजुरी. ही गावकऱ्यांची समिती या सोहळ्याचे नियोजन करते,
*

षडरात्र / चंपाषष्टी.


कडेपठार चंपाषष्टी

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदे पासून खंडोबाची घट स्थापना होते. खंडोबा मणि मल्ल युद्ध झाले ते हे सहा दिवस खंडोबाचे षडरात्र म्हणून साजरे होतात. खंडोबाने मणि मल्लावर विजय मिळवला व ऋषीचे विनंती वरून लिंगरूपाने प्रगटले ते चंपाषष्टी दिवशी.मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस गड व कडेपठारी घटस्थापना करून उत्सवमूर्ती गडावर बारद्वारीत व कडेपठारी भंडारगृहात बसविल्या जातात. रोज रात्री जेजुरीगड रोषणाईने उजळून जातो. गडावरील बारद्वारीत दिवसभर देवा समोर वाघ्या मुरुळीचा हजेरीचा कार्यक्रम सुरु असतो. रोज गडावर अन्नदान सुरु असते. रोज रात्री देवास दुधाचा अभिषेक घातला जातो.
खंडोबा म्हाळसा विवाहावेळी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस तेलवणाचा विधी झाला होता त्या मुळे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीस सायंकाळी गावामधून तेलहंडा निघतो यात भाविक तेल घालतात या तेलाने रात्री देवास तेलवण केले जाते. कडेपठारी हि तेलहंडा निघतो व रात्री देवास तेलवण केले जाते.

मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हा चंपाषष्टी चा दिवस या दिवशी खंडोबाने विजय मिळवला. हा दिवस भाविक विविध कुलधर्म कुलाचाराने साजरा करतात. या दिवशी यात्रा असते. त्यामुळे पहाटे पासूनच लोक विविध कुलधर्म कुलाचारासाठी गर्दी करतात.
*

पौष पोर्णिमा.


हि भटक्या जाती जमातीची यात्रा या दिवशी जेजुरी मध्ये बंगाली पटांगणावर गाढवाचा बाजार भरतो. महाराष्ट्र, गुजरात मधून गाढव आणि खेचरांचे व्यापारी येथे जमतात. बेलदार, वडारी, कुंभार, परीट, इत्यादी जातीचे व्यवसाय गाढवावर अवलंबून असतात अशी मंडळी येथे येतात. गाढवानचे बाजारात मोठी उलाढाल होते. गाढवाचा वाहतूकीसाठी वापर कमी झाल्याचा परिणाम या बाजारावर होत आहे. पौष पोर्णिमाचे दुसरे दिवशी वेंदु समाजातील पैलवानाचे कुस्त्या येथे होतात. व वेंदु समाज्याची जात पंचायत येथे भरते पंच मंडळी समाजातील विविध वादावर येथे निर्णय घेतात. हि पंचायत कधी दोन तीन दिवशी चालते. या वेळी भातु कोलाटी समाज्याची जात पंचायत येथे भरते या पंचायती मध्ये हि न्याय निवाडे होतात. बदलणाऱ्या सामाजिक परस्थितीत हि यात्रा बदलते आहे.
*

माघ पोर्णिमा.


हा म्हाळसेचा जन्मदिन मानला जातो.या यात्रेस मोठ्या प्रमाणावर सोनकोळी समाज कोकणामधून आपल्या खंडोबाचे पालख्या घेऊन देवभेटी साठी जेजुरीस येतात.त्या मुळे चिंचेचा बाग फुलून जातो. पौर्णिमेच्या दुसरया दिवशी मंदिराला काठ्या लावण्याचा सोहळा होतो. महाराष्ट्राचे विविध भागातून काठ्या येतात. काठी हा प्रतीकात्मक देव मानला जातो. अशा देवाची देवभेट करून पुन्हा आपल्या मुळ ठिकाणी काठी जाते. सुपेचे खेंरे, संगमनेरचे होलम, व होळकर यांच्या काठ्या मानाच्या मानल्या जातात .इतरही अनेक काठ्या या सोहळ्यात सहभागी होतात.
*

महाशिवरात्र


माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र या दिवशी गडावरील मुख्य मंदिरातील तळघरातील खंडोबाचे गुप्तलिंग दर्शनासाठी उघडले जाते. मंदिराचे कळसामधील लिंग हि दर्शनासाठी उघडले जाते. वर्षा मधील महाशिवरात्र व दुसरा दिवस या दोन दिवशीच या लिंगाचे दर्शन मिळत असल्याने असंख्य भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.
*

स्थानिक उत्सव

लक्ष्मिआई उत्सव – आषाढ अमावश्येस लक्ष्मिआई मंदिरात पाल जत्रेचे आयोजन केले जाते

श्रावण महिना– श्रावण महिन्यात स्थानिक लोक महिनाभर कडेपठारची वारी करतात. भाविक कडेपठारी भंडारा घालतात यास हास्म असे म्हणतात, भाविकाद्वारे विविध पदार्थ वाटून महिनाभर अन्नदान चालू असते.
बल्लाळेश्वर मंदिरात महापूजा व भंडारा आयोजित केला जातो

नागपंचमी – श्रावण शुद्ध पंचमीस नागपुजे करिता म्हाळसाबाईचे ताट कडेपठार व गड दोन्ही मंदिरातून निघते व मंदिराजवळील नाग प्रतिमांचे पुजन केले जाते.

श्रीयाळ षष्टी

श्रावण शुद्ध षष्टीस दुष्काळातील आपल्या प्रजेला आपले सर्वस्व देऊन टाकणाऱ्या औट घटकेचा राजा श्रीयाळशेठ यांचा स्मृतिदिन या दिवशी सायंकाळी राजा श्रीयाळशेठ व त्याचा प्रतीकात्मक राजवाडा यांच्या प्रतिमा तयार करून यांची गड पायथ्या पासून मिरवणूक काढून त्यांचे चिल्लाळ विहिरीत विसर्जन केले जाते
*
छबिना

आश्विन महिन्यात येणारे प्रत्येक शनिवारी कडेपठार व गडा वरील दोन्ही मंदिरात देवाचा छबिना काढला जातो स्थानिक वादक कलाकार आपल्या कलेने हा छबिना रमवितात रात्री सुरु होणारा हा छबिना मंदिरास प्रदक्षणा मारून पहाटे संपतो
याच पद्धतीने अश्विन महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जनी देवी मंदिरात छबिना निघतो.
*
त्रिपुरी पौर्णिमा

कार्तिक पौर्णिमेस मल्हार गौतमेश्वर मंदिरात व लवथळेश्वर मंदिरात महिला दीपउत्सवाचे आयोजन करतात , फिरंगाई मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते

प्रयोजन – मार्गशीर्ष शुद्ध दशमीस गडावरील मंदिरात प्रयोजनाचा कार्यक्रम होतो
*
दत्त जयंती – मार्गशीर्ष पौर्णिमेस कडेपठारी दत्तमंदिरात सायंकाळी दत्तजयंती सोहळ्याचे व रात्री रेणुका मातेचे कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, जेजुरी मधील होळकरवाड्या मधील व इतर दत्तमंदिरात दत्तजयंती सोहळा होतो
*
थोरली पाखाळणी

फाल्गुन शुद्ध प्रतिपदा सकाळी कडेपठारी मंदिराची सफाई केले जाते. व मिरवणुकीने उत्सव मूर्ती नंदी मंडपात बांधलेल्या झोपाळ्यात बसविल्या जातात, रंग खेळला जातो, सायंकाळी मूर्ती मंदिरात परततात, विविध पदार्थ रांगोळी दीपोत्सव यांनी दिवाळीच साजरी होते.
*
जानाई देवी उत्सव – फाल्गुन शुद्ध ८, ९ , १०, ला जानाई देवीचा उत्सव साजरा होतो नवमीस चौक असतो ग्रामस्थ चौकात नारळ टाकतात,गुलाल खेळतात , दशमीस चौक फुटतो आणि उत्सव संपतो

Comments are closed.