श्री मार्तंड अध्यासन


श्री मार्तंड अध्यासन अनेक वर्ष खंडोबा विषयक अभ्यास व प्रसाराचे कार्य करत आहे, जेजुरी निवासी गणेश टाक इस २००० पासुन खंडोबा विषयक अभ्यासाचा ध्यास घेऊन महाराष्ट्र, कर्नाटक मधील खंडोबा मंदिरांच्या अनेकदा भेटी, अनेक ग्रंथांचा पुस्तकांचा संधर्भ व उपासकांच्या भेटी घेत खंडोबाची विविध प्रांतातील मंदिरे, परंपरा लोककथा याच्या माध्यमातून खंडोबाच्या विविध अंगांचा अभ्यास करत होते, जनसामन्या मधील खंडोबा वरील आढळ श्रद्धा भक्ती शिवाय त्याच्या मध्ये विविध प्रांतातील खंडोबाची रूपे परंपरा ग्रांथिक चरित्र या विषयी प्रसार झाला नसल्याचे त्यांना जाणवले,

श्री मार्तंड अध्यासन स्थापना

खंडोबा विषयी सर्वागाने अभ्यास व्हावा व त्याचा प्रसार करणेसाठी एक माध्यम असावे या गणेश टाक यांचे संकल्पनेतून श्री मार्तंड अध्यासन औपचरिक व्यासपीठाची २४ एप्रिल २००५ रविवार चैत्र पौर्णिमा रोजी श्री खंडोबा अवतार दिनाचे वार व तिथी याचे औचित्य साधुन स्थापना केली,

गणेश टाक यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील खंडोबा मंदिरांचा शोध, त्याच्या विषयीच्या माहितीचे विविध अंगाने संकलन, विविध पुस्तके, ग्रंथ, लोककथा मधुन जास्तीत जास्त अचुक संदर्भ मिळविणे, मंदिरांचे तेथील उत्सवांचे, छायाचित्रण चित्रांकन करणे लिखाण करणे अश्या विविध अंगाने काम सुरु केले,

संकेतस्थळाची सुरवात

खंडोबा मंदिर स्थळाविषयी माहिती संकलनासाठी इंटरनेट वापर करताना, इंटरनेट वर खंडोबा विषयी काहीच उपलब्ध नसल्याचे जाणवले होते, काळाबरोबर धावणाऱ्या या माध्यमाचा खंडोबा सर्वदुर पोचविण्यासाठी उपयोग होऊ शकतो हे ओळखुन गणेश टाक यांनी खंडोबा व जेजुरीच्या प्रसाराचे दृष्टीतून खंडोबा जेजुरी विषयीचे इंटरनेट वरील पहिल्या ब्लॉगची निर्मिती झाली, खंडोबा विषयी माहिती देणारे www.jejuri.net हे संकेतस्थळ १८ मार्च २०१० चैत्र पाडवा रोजी सुरु केले, आणि खंडोबाची जेजुरी भाविक भक्तांसाठी इंटरनेटच्या महाजालात एका क्लिकवर उपलब्ध झाली

 

विविध प्रांतातील खंडोबा मंदिरे संकेतस्थळावर

श्री मार्तंड अध्यासन चे खंडोबा प्रसार कार्यास सुरवात झाली, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील प्रमुख खंडोबा मंदिरेही काही काळातच या संकेतस्थळाचे माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध झाली.

 

जेजुरी यात्रा उत्सवाचे माहितीपटांची निर्मिती

जेजुरी येथील यात्रा उत्सवाचे माहितीपटांची निर्मिती श्री मार्तंड अध्यासनाचे माध्यमातून झाली युटूब व संकेतस्थळा वर जानेवारी २०११ पासुन हे माहितीपट जेजुरीचे उत्सव जगभर पोहचवू लागले, जेजुरीच्या उत्सवावर प्रकाशित झालेले हे पहिले माहितीपट आहेत.

 

ई-ग्रंथ प्रकाशन

खंडोबा उपासनेत महत्वपूर्ण मानला जाणारा “मार्तंड विजय” हा हस्तलिखित ग्रंथ १७ जानेवारी २०१२ रोजी ई-ग्रंथाचे रूपाने इंटरनेटच्या महाजाला संकेतस्थळाचे माध्यमातून गणेश टाक यांनी भाविकांना उपलब्ध करून दिला ई-ग्रंथाचे रूपात प्रकाशित होणारा खंडोबा विषयीचा पहिला ग्रंथ आहे, पुढे सिद्धपाल केसरीचा “मल्हारी महात्म्य” श्रीधरस्वामीचा दोन अध्यायी “मल्हारी महात्म्य” व चित्ररूपाने खंडोबा अवतार कथा सहज सांगणारा “मल्हार विजय” हे ई-ग्रंथ संकेतस्थळाचे माध्यमातून भाविकांना उपलब्ध करून दिले,

 

यात्रा उत्सव संदेश सेवा

जेजुरी मधील यात्रा उत्सवांची माहिती लोकांन पर्यंत वेळोवेळी पोहचावी म्हणून २ जुलै २०११ रोजी sms सेवा सुरु केली, जेजुरी उत्सव विषयक संदेश देणारी ही अश्या पहिली सेवा होती, कालानुरूप बदल करत ७ फेब्रुवारी २०१२ मध्ये या सेवेचे ई मेल सेवेत व पुढे १८ सप्टेंबर २०१५ ला whatsapp सेवेत रुपातर करत ही सेवा सुरु आहे

मोबईल app

९ डिसेंबर २०१५ रोजी “khandoba jejuri” “shri malhari mahatmya” “malhar arati sangrha” “jejuri darshan” अशी खंडोबा व जेजुरी विषयक पहिली मोबईल app प्रकाशित करण्यात आली.

भुपाळी व आरती ध्वनी मुद्रिका

इस २०१४/१५ मध्ये जेजुरी मंदिरामध्ये रोज गायली जाणर्या भुपाळी व आरती ध्वनी मुद्रिका तयार करून लोकांन पर्यंत पोचविण्याच्या गणेश टाक यांचे संकल्पनेला मुर्त रूप मिळाले, ही भुपाळी संकेतस्थळाचे मल्हारवाणी या पृष्ठावर भक्तांना ऐकण्यासाठी उपलब्ध आहे.

सोशल मिडिया माध्यमातून प्रसार

इस २०१० मध्ये ओर्कुट चा माध्यमातून व इस २०११ मध्ये फेसबुक वर वेगवेगळ्या पेजद्वारे सोशल साईट वर सुरु केलेले खंडोबा प्रसाराचे कार्य आज विविध सोशल मिडियाच्या माध्यमातून आज सुरु आहे.
खंडोबा विषयक संशोधन, विविध ग्रंथांचा शोध, कन्नड, तेलगु, तमिळ प्रांतातील मंदिरांना भेटी त्याचे छायाचित्रण, माहिती संकलन, कन्नड, तेलगु, तमिळ प्रांतातील खंडोबा रूपांचा वेध तेथील धार्मिक परंपरा, जनश्रुती या सर्वांचा अभ्यास करत यातून मिळालेले ज्ञान, माहिती विविध माध्यमातून खंडोबा भक्त अभ्यासक यांच्या पर्यंत पोचविण्याचे श्री मार्तंड अध्यासनचे कार्य अविरत चालु आहे व सुरु राहील.
खंडोबा विषयक प्रसार घराघरात पोहचविण्याचे केलेल्या आमच्या खंडोबा सेवेचे यश विविध माध्यमात दिसत आहे, इंटरनेट, चित्रवाहिनी, सोशल मिडिया या सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचा परिणाम जाणवत आहे, खंडेरायाच्या भक्ती प्रसाराची मागितलेली वारी खंडेरायाने आम्हाला मोत्याने भरभरून दिल्याचे समाधान यातून वाटते,
खंडेरायाचे हे भक्ती कार्य सिद्धीस नेण्यास मल्हारी समर्थ आहे, आम्ही निमित्य मात्र.


Comments are closed.