टाक सराफ, जेजुरी

<सुस्वागतम
महाराष्ट्रातील घरा घरां मधील देवघरा मध्ये कुलदैवतांचे टाक पूजले जातात, जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा ची पुण्यनगरी या नगरीत कुलदैवतांचे शास्त्र शुद्ध टाकांचे निर्मितीचा पारंपारिक वारसा आम्ही परंपरेने पुढे चालवीत आहोत, या निर्मिती बरोबरच भाविकांना त्यांचे विषयी मार्गदर्शन ही आम्ही करीत आहोत, आम्ही निर्माण केलेले टाक आज महाराष्ट्रातील असंख्य घरा मधुन पुजले जात आहेत. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांचा यात समावेश आहे, अनेक लोकांना आपल्या कुलदैवतांची माहिती नसते, या माध्यमातून ही माहिती आपणा पर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न, कुलदेवतां विषयी व देव घरातील टाकांची रचना तसेच त्यांची देखभाल या विषयी माहिती देणारे या प्रथम स्थळावर आपले स्वागत येथील माहिती आपणास निश्चितच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.
____________ टाक सराफ जेजुरी

____________

 

देवघरातील कुलदैवतांचे टाक विषयी

देवघरातील कुलदैवतांचे टाक विषयी

अनादी काळा पासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवता मधील कुलदैवतांचे स्थान त्याचे दृष्टीने महत्वपूर्ण कुळाचे आचाराने देव हे त्या कुळाचे कुलदैवत या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात
कुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.
मुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो हा उर्जे चे प्रतिक आहे व उर्जा हाच जीवनाचा आधार मानला जातो.
या पद्धतीने निर्माण केलेले कुलदैवतांचे टाक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मध्ये दिसतात कुटुंबाचे रोजचे पुजे साठी व नैमेतिक कुलधर्म कुलाचारासाठी कुळातील प्रत्येक देव घरात टाक असलेच पाहिजेत असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे

__________

 

कुलदैवतांचे टाकांची रचना

कुलदैवतांचे टाकांची रचना

महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देवघरात पुजे मध्ये कुलदैवतांचे टाक असतात, देवघरातील या टाकांची संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते, ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात, प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या, अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, स्थलांतर, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्या कुलधर्म कुलाचाराची परंपरेची माहिती प्रत्येक परिवारास असतेच असे नाही तेव्हा योग्य ते मार्ग दर्शन गरजेचे असते आपल्या परिसरातील स्थानिक लग्न, पुजा, जोतिष सांगणारे व विविध विधी करणारे पुरोहित, भगत त्याच प्रमाणे सत्संग, केंद्र, बैठक, असे धार्मिक जागृती करणारे यांना या विषयातील परिपूर्ण ज्ञानाचे मर्यादा असतात, त्यामुळे त्यांचे कडून देव घरातील टाकांचे रचने विषयी योग मार्गदर्शन मिळेलच असे नाही म्हणून योग्य अश्या व्यक्ती कडून मार्ग दर्शन घेणे गरजेचे आहे.
__________

कुलदैवतांचे टाक

कुलदैवतांचे टाक

आम्हाला देव घरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा लाभला आहे, कुलदैवतांचे टाकांची शास्त्र शुद्ध निर्मिती आम्ही पिढ्यांन पिढ्या जेजुरी या कुलदैवत खंडेरायाच्या भुमीत करीत आहोत. आपली कुलदैवते देव घरातील त्याचे टाक या विषयी सखोल मार्गदर्शन आम्ही परंपरेने करत आलो आहोत, आपल्या देवघरासाठी आमच्या कडे शुध्द चांदीचे शुध्द तांब्याची पाठ बसवलेले पारंपरिक शास्त्र शुध्द पध्दतीने आम्ही बनविलेले, मजबुत टिकाऊ असे विविध कुलदैवतांचे, विविध आकारातील टाक उपलब्ध आहेत, आमच्या कडील उपलब्ध साईज

चांदीचे टाक

~~~~~~~

Silver Tak

Silver Tak

Silver Tak

4G ~ 5.5 × 4 c.m

Silver Tak

6G ~ 6.5 × 5.2 c.m

Silver Tak

10G ~ 7 × 5.5 c.m

Silver Tak

15G ~ 9.5 × 7.5 c.m

Silver Tak

30G ~ 13.5 × 10.5 c.m

Silver Tak

50G ~ 18 × 14 c.m

Silver Tak

100G ~ 22 × 18 c.m

_____

पंचधातु टाक

ज्यांना पंचधातु चे टाक हवे आहेत त्यांचे करिता, पारंपरिक शास्त्र शुध्द पध्दतीने आम्ही बनविलेले, मजबुत टिकाऊ असे पंचधातुचे विविध कुलदैवतांचे टाक उपलब्ध आहेत, आमच्या कडील उपलब्ध साईज

panchadhatu Tak

Panchadhatu ~ 6.5 × 5.2 c.m

Panchadhatu Tak

Panchadhatu (A) ~ 9.5 × 7.5 c.m

Panchadhatu Tak

Panchadhatu (SP) ~ 9.5 × 7.5 c.m

अधिक माहितीसाठी:

💬 व्हॉट्सॲप करा

___

 

मुर्ती, पुजा वस्तू

मुर्ती पुजावस्तू

देवघरात कुलदैवतांचे सोबत गणपती, अन्नपूर्णा, लक्ष्मी, बाळकृष्ण अशा विविध इस्ट देवतांची ही पुजा केली जाते, कुलदैवतांचे काही पुजा वस्तू ही देवघरात पुजेत असतात अशा मुर्ती व वस्तू आमच्या कडे उपलब्ध आहेत.

silver khandoba murti

खंडोबा मुर्ती

silver khandoba murti

खंडोबा मुर्ती

khandoba silver face mask

देव मुखवटा

goddess silver face mask

देवी मुखवटा

khandoba Gatha

गाठा

khandoba gatha

गाठा

khandoba gatha

गाठा

khandoba shikka

शिक्का

ganpati silver murti

गणपती

laxmi silver murti

लक्ष्मी

Annapurna silver murti

अन्नपूर्णा

balkrishna silver murti

बाळकृष्ण

nag singer murti

नाग

laxmi silver coin

लक्ष्मी नाणे

laxmi silver charan

लक्ष्मी पाऊल

_________

 

देवघरातील टाकांची देखभाल

देवघरातील टाकांची देखभाल

देवघरातील टाकांची दररोजची स्वच्छता ही सौम्य आणि सुरक्षित असावी जेणेकरून धातूची झीज होणार नाही. टाक स्वच्छ करण्यासोबतच त्या जपण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.

१. कोरडेपणा सर्वात महत्त्वाचा दररोज टाकांना स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा, अभिषेकानंतर टाकांवर पाण्याचे सूक्ष्म थेंब राहिल्यास तांब्यावर ‘बेसिक कॉपर कार्बोनेट’ (हिरवट थर) आणि चांदीवर ‘सिल्व्हर सल्फाइड’ (काळा थर) तयार होतो. ​बोअरचे क्षारयुक्त पाणी, नळाद्वारे येणारे क्लोरिनयुक्त पाणी याने हि प्रक्रिया सुरु होते, त्यामुळे लगेच ते मऊ सुती कापडाने (Microfiber cloth) कोरडे करा. पाण्याचे थेंब तसेच राहिल्यास त्यावर डाग पडतात आणि तिथूनच चांदी काळी पडायला सुरुवात होते. टाक कोरडे करण्यासाठी नेहमी स्वतंत्र आणि स्वच्छ कापड ठेवा. तुम्ही टाकांना जेव्हा पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर) अभिषेक करत असाल, तर त्यानंतर टाक अभिषेका नंतर उटणे व साध्या पाण्याने स्वच्छ धुणे आवश्यक आहे, जेणेकरून चिकटपणा राहणार नाही.

२. कोरड्या हातांचा वापर: चांदीच्या टाकांना कोरडे केल्या नंतर शक्यतो ओल्या हाताने स्पर्श करू नका. गंध अक्षदा वहाताना कोरड्या स्वरुपातील वहाव्यात, कोरडा गंध लावावा ओला गंध लावु नये.

३. विभूती चा वापर देवाचे टाक पुसल्यानंतर त्यावर थोडी विभूती (भस्म) लावून कापडाने पुसून काढा. यामुळे चांदीवर एक संरक्षक थर तयार होतो जो हवेचा संपर्क रोखतो.

४. कापूर आणि उदबत्तीपासून लांब ठेवा देव्हाऱ्यात उघडा कापूर कधीही ठेवू नका. कापुरातील सल्फरमुळे चांदी अतिशय वेगाने काळी पडते.

५. उदबत्तीचा धूर उदबत्ती किंवा धूप यांचा धूर थेट चांदीवर बसल्यास त्यावर काळा चिकट थर साचतो. त्यामुळे धूर मूर्तींपासून थोडा लांब राहील याची काळजी घ्या.

६. दिव्याची जागा बदला देव्हाऱ्यातील निरंजन किंवा समई चांदीच्या टाकांचे अगदी जवळ ठेवू नका. दिव्याच्या वातीतून उडणारे तेलाचे सूक्ष्म कण आणि काजळी मूर्तीवर बसते. दिवा मूर्तीपासून किमान ८ -१० इंच लांब ठेवल्यास तेलकटपणा कमी होईल. शक्य असेल तर दिव्यावर काचेचे कव्हर (Chimney) वापरा, ज्यामुळे तेलकट धूर सर्वत्र पसरणार नाही.

७. नैवेद्य आणि प्रसादाची काळजी मूर्तीला साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवताना त्याचा थेट स्पर्श मूर्तीला होणार नाही याची काळजी घ्या. जर हाताला तेल किंवा तूप लागले असेल, तर त्याच हाताने टाकाला स्पर्श करणे टाळा.

८. पडल्यामुळे होणारे नुकसान पूजा करताना किंवा टाक हलवताना उंचीवरून पडल्यास टाकाचा आकार बिघडू शकतो , टाक पंचकोनी असल्याने एखादे कोनावर पडल्याने तो भाग वाकू शकतो, व त्यांची किनारी ची पकड सैल होवु शकतो, त्यामुळे टाक उंची वरुन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

९. कडक घासण्याचा वापर नको तारेची किंवा प्लास्टिकची कडक घासणी, रांगोळी सारखे खरखरीत वस्तू स्वच्छते साठी वापरू नका; यामुळे मूर्तीचे नाजूक अवयव (डोळे, नाक) झिजतात. ​

१०. डिटर्जंट, साबण किंवा पावडर यांचा वापर नको कपडे धुण्याचे साबण, भांडी घासणे ची पावडर वापरल्याने धातूची वेगाने झीज होते व मूळ चमक कायमची जाऊ शकते. धातुचे मुर्ती वस्तु स्वच्छ करण्यासाठी अनेक पावडर बाजारात मिळतात या पावडर वापरल्याने धातूची वेगाने झीज होते व छिद्र पडतात ( टाक भंग पावतात ) त्यामुळे अशा कोणत्याही पावडरचा वापर करु नये.

११. केमिकल पॉलिशचा वापर नको बाजारात मिळणारी रासायनिक पॉलिश ( लिक्विड ) वारंवार वापरल्याने चांदीचा पातळ थर निघून जाऊ शकतो. चांदी साठी वापरण्याचे रसायन तांब्याला धोकादायक ठरु शकते व तांबे साठी वापरण्याचे रसायन चांदीला धोकादायक ठरु शकते, त्यामुळे अशा कोणत्याच पाँलिशचा उपयोग करु नका.

१२. स्वच्छते साठी नैसर्गिक साधनांचा वापर स्वच्छतेसाठी रिठा, चिंच, लिंबु अशा नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा, त्यांची प्रक्रिया सोबत दिली आहे, त्याचा उपयोग करावा, आठवड्यातून आवश्यक असेल तर एकदा रिठ्याच्या फेसाने किंवा फक्त दह्याने हलकेच साफ करणे. ईतर पध्दतीचा उपयोग अत्यावश्यक असेल तेव्हाच करा.

आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.

__________

 

आमच्या विषयी

आमच्या विषयी
महाराष्ट्रातील घरा घरां मधील देवघरा मध्ये कुलदैवतांचे टाक पूजले जातात या कुलदैवतांचे शास्त्र शुद्ध टाकांचे निर्मितीचा पारंपारिक वारसा आम्ही परंपरेने पुढे चालवीत आहोत, या मुळे आमचे आडनाव टाक पडले आहे, जेजुरी या कुलदैवत खंडेरायाच्या भुमी मध्ये परंपरेने टाकांचे निर्मिती बरोबरच भाविकांना त्यांचे विषयी मार्गदर्शन ही आम्ही परंपरेने करीत आहोत, आम्ही निर्माण केलेले टाक आज असंख्य घरा मधुन पुजले जात आहेत. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांचा यात समावेश आहे, आम्हाला देव घरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा लाभला आहे, या मुळे आपली कुलदैवते देव घरातील त्याचे टाक या विषयी सखोल मार्गदर्शन आम्ही परंपरेने करत आलो आहोत, त्याच बरोबर कुलदेवतांचे टाकांची शास्त्र शुद्ध निर्मिती करीत आहोत. आपल्या देवघरासाठी आमच्या कडे विविध आकारातील टाक उपलब्ध आहेत.

आमची वैशिष्ट्ये

● “टाक’ निर्मितीचा पिढ्यांन पिढ्यांचा पारंपरिक वारसा.

● देवघरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा.

● कुलदैवतांचे देवघरातील टाक या विषयी सखोल मार्गदर्शन.

● कुलदैवतांचे टाकांची परंपरेनुसार शास्त्र शुद्ध निर्मिती.

● विविध आकारातील टाक उपलब्ध.

● घरपोहच सेवा उपलब्ध

___________

 

<

 

संपर्क

संपर्क

टाक सराफ
राजवाडा चौक ,महाद्वार मार्ग, जेजुरी.
ता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र.
पिन – ४१२३०३
फोन – ९८२२३९४९१५ whatsapp – 9822394915
इमेल – taksaraf@gmail.com

Tak Saraf jejuri visiting card

**

Comments are closed.